Sunday, December 11, 2005

बदलता भारत

अलिकडेच 'बदलता भारत' (लेखक: भानू काळे) हे पुस्तक वाचनात आले. जागतिकीकरण, त्याबरोबर झपाटयाने बदलत जाणारे सामाजिक-सांस्कृतिक जीवन, हे आजकाल चर्चेचे लोकप्रिय विषय आहेत. लेखकाने आपल्या पुस्तकात हेच विषय भारताच्या संदर्भात मांडले आहेत.


भारतभर भ्रंमती करून, तेथील परिस्थितीचे सर्वांगाने निरिक्षण करूनच ह्या पुस्तकातील प्रत्येक लेख जन्मला आहे, हे पुस्तक वाचताना लगेच लक्षात येते. पुस्तकातील प्रत्येक लेख (१-२ अपवाद वगळता) बदलत्या भारतातल्या, लेखकाला उल्लेखनीय वाटणाऱ्या अशा एका शहरावर केंद्रित केला गेला आहे. कोणत्याही देशातील किंवा समाजातील बदलांचा अभ्यास करताना तेथील इतिहासाचा संदर्भ ठेवणे आवश्यक आहे. बदलांचा आलेख रेखाटताना, लेखकाने ठेवलेले हे भान हे ह्या पुस्तकचे वैशिष्टय होय. इतिहासाचा वेध घेतल्यामुळे पुस्तकातील लेख अधिक रंजक आणि माहितीपूर्ण झाले आहेत असे मला वाटते.


विकसनशील देशांमधील शर्यतीत आज भारत निश्चितच आघाडीवर आहे. परंतू आपल्या देशाला-समाजाला विकासाच्या अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. विकासाच्या मार्गात अनेक अंतर्गत-बाह्य अडथळेही आहेत. 'WE ARE STILL LOW IN THE FOOD CHAIN' पण म्हणून आपण स्वतःकडे कमीपणा घ्यायची गरज नाही. आपण कुठे होतो आणि कुठवर आलो आहे, ह्याकडे बघून उत्साहाने आणि सकारात्मक द्रुष्टीकोन ठेवून मार्गक्रमणा चालू ठेवली पाहिजे; लेखकचा हा आशावादी सूर मला महत्त्वाचा वाटतो.


बदलत्या भारतच्या यशात खारीचा वा सिंहाचा वाटा उचलणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे असे मला वाटते.

2 comments:

Nandan said...

अकिरा, या पुस्तकाचे लेखक श्री. भानू काळे हे 'अंतर्नाद' मासिकाचे संपादकही आहेत का? परवाच अजून एका मित्राकडून या पुस्तकाबद्दल ऐकले, त्यामुळे ते वाचायची उत्सुकता अजून वाढली आहे.

Akira said...

@Nandan,
Yes Bhanu Kale IS the editor of AntarnAd. Do read the book when you get a chance.