नंदनने मला ह्या खेळात सामील करून घेतले. खेळाविषयी अधिक माहिती करता -
http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक.~ 'रारंग ढांग' - प्रभाकर पेंढारकर
२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती.~ नुकतीच सुरूवात केली आहे, त्यामुळे लेखकाच्या शब्दात सांगायचे तर - "एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे! निसर्गात आणि माणसांत जशी येथे रस्सीखेच व संघर्ष, तसाच प्रसंगी माणसामाणसातही! त्याची ही कथा."
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) ५ पुस्तके. ~ 'बदलता भारत' - भानू काळे
~ 'स्मृति-चित्रे' - लक्ष्मीबाई टिळक
~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - कै. कृष्णशास्त्री चिपळूणकर, कै. विष्णूशास्त्री चिपळूणकर, कै. हरि कृष्ण दामले
~ 'वाइज ऍन्ड अदरवाइज' - सुधा मूर्ती (मराठी अनुवाद)
~ 'मी कसा झालो' - आचार्य अत्रे
४. अद्याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके.~ 'आमच बाप अन आम्ही' - नरेंद्र जाधव
~ 'ययाति' - वि.स. खांडेकर
~ 'दासबोध' - समर्थ रामदासस्वामी
~ Sorry can't think of more right away.
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - शाळेत शिकत असताना, एका सुट्टीत गावी गेले होते. त्यावेळी तिथल्या घरी मला ह्या ५ पुस्तकांचा संच सापडला. पुस्तकांची पानं जीर्ण झाली होती; अगदी जपून पुस्तकं हाताळायला लागत होती. ह्यातल्या गोष्टी, वाचणाऱ्याला, एका वेगळ्याच अद्भुत विश्वाची (राजकुमार-राजकन्या, त्यांच्या चमात्कारिक शक्ती, गोष्टी..) सफर घडवून आणतात. ह्यामुळेच माझ्या बालमनाला ती पुस्तके भावली असतील असे वाटते. त्यावेळी मला खजिना गवसल्यासारखे वाटले होते; अजूनही मी ती पुस्तक जपून ठेवली आहेत.
ह्य खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करते -