Friday, August 04, 2006

मराठी पुस्तकांविषयी थोडेसे..


नंदनने मला ह्या खेळात सामील करून घेतले. खेळाविषयी अधिक माहिती करता - http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक.
~ 'रारंग ढांग' - प्रभाकर पेंढारकर

२. वाचले असल्यास त्याबद्दल थोडी माहिती.

~ नुकतीच सुरूवात केली आहे, त्यामुळे लेखकाच्या शब्दात सांगायचे तर - "एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसे! निसर्गात आणि माणसांत जशी येथे रस्सीखेच व संघर्ष, तसाच प्रसंगी माणसामाणसातही! त्याची ही कथा."

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी/(इतक्यात वाचलेली) ५ पुस्तके.
~ 'बदलता भारत' - भानू काळे
~ 'स्मृति-चित्रे' - लक्ष्मीबाई टिळक
~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - कै. कृष्णशास्त्री चिपळूणकर, कै. विष्णूशास्त्री चिपळूणकर, कै. हरि कृष्ण दामले
~ 'वाइज ऍन्ड अदरवाइज' - सुधा मूर्ती (मराठी अनुवाद)
~ 'मी कसा झालो' - आचार्य अत्रे

४. अद्याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके.
~ 'आमच बाप अन आम्ही' - नरेंद्र जाधव
~ 'ययाति' - वि.स. खांडेकर
~ 'दासबोध' - समर्थ रामदासस्वामी
~ Sorry can't think of more right away.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.

~ 'अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी' - शाळेत शिकत असताना, एका सुट्टीत गावी गेले होते. त्यावेळी तिथल्या घरी मला ह्या ५ पुस्तकांचा संच सापडला. पुस्तकांची पानं जीर्ण झाली होती; अगदी जपून पुस्तकं हाताळायला लागत होती. ह्यातल्या गोष्टी, वाचणाऱ्याला, एका वेगळ्याच अद्भुत विश्वाची (राजकुमार-राजकन्या, त्यांच्या चमात्कारिक शक्ती, गोष्टी..) सफर घडवून आणतात. ह्यामुळेच माझ्या बालमनाला ती पुस्तके भावली असतील असे वाटते. त्यावेळी मला खजिना गवसल्यासारखे वाटले होते; अजूनही मी ती पुस्तक जपून ठेवली आहेत.

~ इतक्यात वाचनात आलेल्या 'बदलता भारत' हे पुस्तक मला फार आवडले. त्या बद्दल थोडेसे इथे - http://dhyaas.blogspot.com/2005/12/blog-post.html

ह्य खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करते -

6 comments:

Milind said...

खेळाच्या निमंत्रणासाठी धन्यवाद!
नक्कीच लिहीन :)

Akira said...

Dhanyawaad Milind. Waat paheen..

Milind said...

'चे'मिलिंद हे वाचुन हसायला आले!
एकतर माझे विचार जास्त प्रगल्भ वाटत असावेत किंवा जुनाट :D

Akira said...

marathi bhidasta swabhaw...lagech "are-ture" karta yet nahi ;)

VishaL KHAPRE said...

तुम्ही रारंग ढांग वाचत आहात हे वाचुन जुन्या गोष्टी आठवल्या, सारंग भणगे या मित्राने मला भेट दिले होते, अगदी झकास पुस्तक आहे. मन त्या काश्मिरच्या आठवणीतुन बाहेर येतच नाही. तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा.

Amruta said...

hi sarika,
thanks for tagging me... pan khata tar itkyat kahi pustaka vachli nahiyet... but definitely plan to read some... matra vachalyavar avashya lihin.
:)