Saturday, February 11, 2006

ती

ही माझी पहिली कविता. अवचितपणे, काल पहाटे सुचलेली. सकाळी मनात घोळत असलेले शब्द लिहून काढले आणि मग रात्री वेळ मिळाल्यावर त्यांना कवितेत बांधले. मला कल्पना आहे की माझी कविता, पद्याचे अनेक नियम मोडते. वास्तविक माझं काव्यवाचन नगण्य आहे. कुणी वाचून दाखवली तर कविता ऐकायला मला आवडते (आळसाचा कळस!?) आणि तेव्हा झालेल्या चर्चेतून मला ती अधिक चांगली कळते. हे नमनाचे घडाभर तेल, माझ्या कवितेच्या समर्थनार्थ आहे, हे एव्हाना तुम्हा सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच! ;) असो...

तुमच्या सुचनांनी मला माझ्या कवितेतील त्रुटी कळतील आणि सुधारता येतील ह्या अपेक्षेने, माझी कविता इथे प्रदर्शित करायचे धाडस करत आहे...

ती - माणसांत असूनही एकटी,
जगात असूनही नसल्यासारखी.

ती - प्रश्नांच्या भोवऱ्यात उत्तरं शोधत,
जिवंत असूनही स्वतःच्या अस्तित्वाचा उद्देश शोधत.

ती - वाट सापडली आहे असे वाटूनही,
पथदर्शक शुक्राच्या शोधात,

कधी, कुठे उलगडतील ही कोडी??
कुणास ठाऊक....

एव्हाना तिला उमजलय फक्त एवढच,
हा शोध, ही साधना, करायची असते प्रत्येकाने स्वतःच!

3 comments:

Nandan said...

अकिरा, कविता आवडली. पद्याच्या नियमांपेक्षा आशय महत्त्वाचा असे मला वाटते. आणि हो, क्रीडा चषकाबद्दल अभिनंदन.

Jupiter said...

चांगली जमली आहे.
एवढा loose confidence ठेवू नकोस.

नंदन बरोबर म्हणतो - पद्याच्या नियमांपेक्षा आशय महत्वाचा !

abhijit said...

manmokali aahe....