Saturday, July 01, 2006

पावसाच्या गोष्टी - ॥३॥

'कॉफी हाऊस' च्या वरच्या मजल्यावरच्या नेहेमीच्या जागेवर ते दोघे बसले. हे त्या दोघांच आवडीचं ठिकाण होतं. इथे निवांत गप्पा मारत-कॉफी पित बसायला त्यांना आवडायचं. अशी निवांत ठिकाणच हळूहळू नाहिशी होत होती. अर्थात, दोघं नोकरीला लागल्यापासून, त्यांच्या आयुष्यातला निवांतपणाही जवळपास लुप्तच झाला होता. तरीही ८-१५ दिवसांत एकदातरी वेळ काढून भेटायचेच असा त्यांनी नेम केला होता.

३ वर्षांपूर्वी इथेच त्यांची प्रथम ओळख झाली होती. University मध्ल्या वार्षिक 'India Night'च्या नियोजनाविषयी चर्चा करायला, committeeने येथे भेटायचे ठरवले होते. दोघेही त्याच वर्षी PhD करायला म्हणून तिथे दाखल झाले होते. अभ्यासाचे विषय वेगवेगळे असले तरी - नवीन देश, कला-संगीत-भटकंती-माणसं अशा समान आवडी, मोकळे, गप्पिष्ट स्वभाव ह्यामुळे त्यांची लगेच गट्टी जमली.

पण आज गप्पा मारायला फुरसत नव्ह्ती. त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी दोघांकडे सोपविण्यात आली होती. कार्यक्रम १५ दिवसांवर आला होता तरी त्यांची काहीच तयारी झाली नव्हती. आज किमान कच्चा मसुदा लिहून काढायचा असा दोघांनी निश्चय केला होता.

कॉफीचे घुटके घेत, चर्चा करत, मनातले विचार कागदावर उतरविण्यात ते मग्न होते. त्याचे अक्षर चांगले म्हणून लिखाणाचे काम तिने नेहेमीप्रमाणे त्याच्यावर ढकलले होते. ३-४ कॉफीच्या फेऱ्यांनंतर, तब्बल २-२.५ तासांनी ते विसावले. काम मनासारखे झाले म्हणून दोघेही खुश होते.

थोडावेळ गप्पा मारून घरी जावे असे त्यांनी ठरवले. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पावसाळ्याचे दिवस असूनही बाहेर सुर्य तळपत होता. हळूहळू गप्पा रंगात आल्या - कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी, गमती-जमती, सध्याची धकाधकीची दिनचर्या...

लख्ख ऊन होतं आणि पावसाला सुरूवात झाली होती. ऊन्हामुळे पाण्याचे थेंब चकाकत होते. मोठे मनोरम दृश्य होते. तिने त्याचे लक्ष बाहेरच्या पावसाकडे वेधले. दोघेही गप्पा विसरून पावसात हरवले. काही क्षण असेच गेले. अचानक त्याचे लक्ष काचेवर पडलेल्या तिच्या हसऱ्या प्रतिबिंबाकडे गेले. त्याला प्रथमच तिचे सौंदर्य जाणवले. तो स्वतःशीच हसला. दोघांनी एकमेकाकडे पाहिले - डोळे मनातलं सर्व काही बोलून गेले. पाऊस जितका अचानक आला तितकाच अचानक थांबला....दोघांच्याही नकळत, अनाहूतपणे, त्यांच्या आयुष्याच्या एका नवीन सोनेरी पर्वाची सुरूवात झाली होती.

7 comments:

paamar said...

अहा ! सहज आणि सुंदर. Your idea of a perfect first date ? ;)

Milind said...

सुरेख.
नाच रे मोरा नाच या गाण्याचे हे कडवे आठवले-
"पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे"

शैलेश श. खांडेकर said...

मागच्या दोन्ही कथांप्रमाणे शेवट छानच आहे. सुखान्त झाल्यामुळे कथा छान वाटते.

Akira said...

Thanks guys.

@Nikhil - Yes mabbe..pan hya asha goshti cinematach hotat bahuda evdha kalaycha shahanpan alay.. ;)

@Milind - Wa hee ol chapkhal bastye.. :)

आदित्य said...

तुझ्या पहिल्या गोष्टीला तर मी तिथेच दाद दिली आहे आता २ आणि ३ बद्द्ल एकत्र इथेच लिहितो (ह्या कंजूषपणाबद्द्ल माफी मागतो :) )

तुझी पाऊस त्रिकथी (trilogy) फार आवडली २ मधला साधेपणा भावला आणि पावसाकडे असंसुद्धा बघता येतं हे जाणवलं. ३ तर सुंदरच आहे अशी पर्फेक्ट डेट ज्यांच्या वाट्याला येते त्यांचा खूप हेवा वाटतो :) मी स्वत: सुखान्त/दु:खान्त ह्यावर फार भर देणारा नाही आहे. माझ्या मते जे आयुष्यात खरंच घडतं/घडू शकतं ते आपण आपापल्या तराजू मध्ये तोलून त्यातलं सुख /दु:ख ठरवावं.

Akira said...

Dhanyawad Aditya! :)

3 goshti lihun jhalyawar, ek vichar ala hota ki 9 rasawar 9 goshti lihawyat....Karun ani Shringar ras pahilya ani tisarya goshteet jhale ahet..baghuya tasa kahi suchtay ka te..

Tu sukha-dukkha babat je mhanalas te pattay...

Vidya Bhutkar said...

वाह! पाऊस नेहेमीच वेगवेगळ्या आठवणी, भावना कधी वेदना घेऊन येतो. तीनही गोष्टी आवडल्या आणि त्या लिहिण्याची, म्हणजे पावसातीलच कथा लिहिण्याची कल्पना आवडली. Keep writing.
-विद्या.